शिक्षकांच्या रिक्त पदासाठी मानधन तत्वावर डी.एड, बि.एड युवकांना संधी द्यावी

Bhairav Diwase
0
ब्रम्हपुरी युवक काँग्रेसची मागणी
ब्रम्हपुरी:- महाराष्ट्र राज्य तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात डी.एड, बी.एड पास झालेले अनेक सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी असून त्यांना मानधन तत्त्वावरील तात्पुरत्या शिक्षक भरती प्रक्रियेत संधी देण्याची मागणी ब्रम्हपुरी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे व ब्रम्हपुरी शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरज मेश्राम यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी युवक काँग्रेस तर्फे उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे राज्याचे मा.मुख्यमंत्री व मा. शिक्षण मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

  दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात प्राथमिक शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त असल्याने व नविन शिक्षक भरती प्रक्रियेला वेळ असल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नियुक्त करण्यात येणार असल्याचे शासन परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे.
पुर्ण वेतनावर शिक्षक न भरता २० हजार रूपये मानधना वर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना कंत्राटी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करणे हा एक प्रकारचा डी.एड, बी.एड पास झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय असून एकीकडे लाखो डी.एड, बी.एड पास बेरोजगार युवक/युवती असताना त्यांना रोजगार द्यायचा सोडून अगोदरच पेन्शन धारक लोकांना शिक्षक म्हणून नेमण्याचा प्रकार म्हणजे या बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. हा शासन निर्णय रद्द करून डी.एड, बी.एड पास बेरोजगार युवकांना ही संधी देण्यात यावी अशी मागणी ब्रम्हपुरी युवक काँग्रेस कमिटी तर्फे सरकारकडे करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास व लाखो सुशिक्षित बेरोजगार युवक ,युवतीवर अन्याय झाल्यास सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्रम्हपुरी युवक काँग्रेस ने सरकारला दिला आहे.

निवेदन देण्यासाठी ब्रम्हपुरी विधानसभा व तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे, ब्रम्हपुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज मेश्राम, ब्रम्हपुरी युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके,वकार खान, मयूर मेश्राम,डेनी शेंडे,अनिकेत उराडे, प्रतीक नरड,युगल नागदेवते,रुपेश उरकुडे,ध्रुव नाकतोडे, चोकेशवर भरडकर,सुरज एम.मेश्राम,शुभम मेश्राम, साहिल गजभिये,सुशांत बनकर व इतर सदस्य उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)