चंद्रपूर:- महाराष्ट्र येथील रायगड जिल्ह्यातील शिवभक्त सुबोध गांगुर्डे यांचा ३६५ दिवस ३७० किल्ले रायगड ते माऊंट एव्हरेस्ट असा प्रवास सुरू आहेत. तसेच या प्रवास दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांचा प्रवास मागील २४४ दिवसापासून सुरू आहेत,त्यांनी आज पर्यंत ३३२ किल्ले सर केले आहेत व प्रत्येक गड किल्ल्यांची माती गोळा करून करून त्यांचे चंद्रपूर येथील गड किल्ल्यांना भेट देण्यासाठी चंद्रपूर नगरीत आगमन झाले,ही माहिती भारतीय जनता युवा मोर्चा च्या पदाधिकारी यांना प्राप्त होताच शिवभक्त सुबोध गांगुर्डे यांच्याशी संवाद साधून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले,
सुबोध गांगुर्डे यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून माननीय सुधीर भाऊंनी भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिल्या.
सोबतच भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ निंबाळकर तर्फे सुंदर अशी भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले व पुढील प्रवासासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुबोध गांगुर्डे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येका पर्यंत पोहचवण्याचे काम करीत आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर जागतिक पातळी वर ते महाराजांचं व महाराष्ट्राचे नाव पोहचवण्याचे काम करीत आहेत.यावेळी भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, उपाध्यक्ष व सिनेट सदस्य यश बांगडे, राहुल पाल, मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार ,विपीन येंगलवार उपस्थित होते.