चाकूचा धाक दाखवून सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार #chandrapur #majari #torture


चंद्रपूर:- माजरी पोलिस ठाण्याअंर्तगत घरी कोणी नसल्याची संधी साधून सासऱ्याने चाकूचा धाक दाखवत २२ वर्षीय सुनेवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. पीडितेने पोलिस स्टेशन गाठून सासऱ्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

मोबाईलवरून अश्लील मॅसेज पाठवित महिलेचा विनयभंग

9 जुलै रोजी पती आणि दीर रात्रपाळीत कामावर गेले होते. दरम्यान, पीडित महिला, मुले, आजारी सासू तसेच सासरे घरी होते. सासऱ्याने सुनेला घरी एकटी बघून रात्री टीव्हीचा आवाज वाढविला आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत सकाळी तिने पती तसेच दीराला याबाबत माहिती दिली. मात्र, कुटुंबीयांची बदनामी होईल, असे म्हणून गप्प बसण्यास बाध्य केले. दरम्यान, हा प्रकार उघड करू नये यासाठी सासऱ्याकडून धमक्या दिल्या जात असल्याने तिला मानसिक धक्का बसला. अखेर सुनेने मानसिक धक्क्यातून सावरत १५ जुलैला माजरी पोलिसात तक्रार नोंदवली. आरोपी सासऱ्याविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (फ) भादंवी अन्वये गुन्हा नोंद करून त्याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सपोनी भोजराज लांजेवार करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या