Top News

मोबाईलवरून अश्लील मॅसेज पाठवित महिलेचा विनयभंग #chandrapur #majari

चंद्रपूर:- माजरी पोलिस ठाण्याअंतर्गत एका महिलेला मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून लैंगिक सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

चाकूचा धाक दाखवून सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार

२६ वर्षीय पीडित महिलेला आरोपी कौशल संतोष माळवे (१९), रा. पाटाळा याने फेसबुक, व्हॉट्सअँप आणि मोबाइलवर संपर्क करून वारंवार मेसेज व कॉल करीत होता. एवढेच नाही तर तिच्याकडे बघून अश्लील इशारे करून लज्जास्पद वर्तणूक करून तिचा विनयभंग केला. या छळाला कंटाळून पीडित महिलेने माजरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी कौशल संतोष माळवे याच्या विरुद्ध कलम ३५४ (अ), ३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास माजरी पोलिस करीत आहे।

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने