नागरिकांनो! कडधान्याचा उपयोग निरोगी आरोग्यासाठी करा #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम यांचे आवाहन

पोंभुर्णा:- ‌देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले आणि भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने भरड धान्य वर्ष अभियान विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

अन्न म्हणून भरड कडधान्य हे शरीरासाठी अतिशय पौष्टिक तत्वे असणारे आहे. त्यामुळे हे वर्ष भरड धान्य म्हणून जाहीर केले. भरड धन्याच्या माध्यमातून कॅल्शियम, पोट्याशियम, विविध जीवनसत्वे, पौष्टिक तत्वे उपलब्ध होतात. त्यामुळे कडधान्य पिकवणारी शेतकरी, कडधान्य विकणारे विक्रेते तसेच गृह उद्योग करणाऱ्या महिला यांना शाल व वृक्षरोपटे देऊन सन्मान करण्यात आले. तसेच गरोदर माता यांना पौष्टिक भरड धान्य देण्यात येऊन धान्याचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सन्मान केला. तसेच अंगणवाडीला भेटी देऊन गरोदर माता यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अल्का आत्राम महामंत्री प्रदेश महिला मोर्चा, सुलभा पिपरे नगराध्यक्ष, आकाशी गेडाम नगरसेविका, वैशाली वासलवार, रोशन ठेंगणे भारतीय जनता युवा युवा मोर्चा, सचिन पोतराजे सरपंच, प्रेमदास इस्ताम, अंगणवाडी सेविका कोवे आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.