ताडोबाच्या कोर मधील सफारी आजपासून बंद #chandrapur #Tadobaandhari

Bhairav Diwase

चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर मधील सफारी आजपासून बंद होणार आहे. प्रकल्पाच्या बफर झोनचे दरवाजे मात्र पर्यटनासाठी खुले राहणार आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. येथे उन्हाळ्यात यावेळी पर्यटकांचा उदंड प्रतिसाद सफारीला लाभला आहे. त्यामुळे यंदा मार्च ते जून अखेरीसपर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी प्रकल्पात सफारीदरम्यान दिसून आली.

आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी शनिवारपासून बंद होणार आहे. पण बफर झोनचे दरवाजे पर्यटनासाठी खुले राहणार आहे. दरम्यान व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पर्यटन करतांना व्यवस्थापनाने १ जुलैपासून प्रवेश शुल्क वाढविले असून पर्यटकांवर सुमारे १ ते २ हजार रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.