Top News

जिल्ह्यात लक्झरी बसचा भीषण अपघात; २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू (Samruddhi Mahamarg Accident)


बुलढाणा:- समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना (A terrible accident occurred on the Samriddhi highway) समोर आली आहे. बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर (On Samriddhi Highway near Buldhana) विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा (MH २९ BE १८१९) भीषण अपघात झाला आहे. (Vidarbha Travels private luxury bus has met with a terrible accident) चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. (As the driver fell asleep, the bus hit the dewire directly) या अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर ७ प्रवासी जखमी असून उपचार सुरू आहेत. (Preliminary information is that 26 passengers died in this accident. 7 passengers are injured and undergoing treatment)


सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. (This incident happened around Friday night in Sindkhedaraja area) घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Fatal accident of luxury bus in district; 26 passengers died in the runaway)


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते. बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला.
(Buldhana bus accident)

या भीषण अपघातात बसमधील २६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ७ प्रवासी जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Samruddhi Mahamarg Accident)


लक्षवेध...... तातडीचे /महत्त्वाचे

आज दिनांक १ जुलै २०२३ रोजी नागपूर वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स (MH २९ BE १८१९) या खाजगी बसचा मौज पिंपळखुटा, तहसील सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे २ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून सदर बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी  जिल्हा नियंत्रण कक्ष (0712-2562668) अथवा अंकुश गावंडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8860018817) यांच्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन नागपुर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 सदर बसमध्ये वर्धा जिल्हातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती बुकिंग ऑफिस कडून प्राप्त झाली. यामध्ये प्रवाश्यांचे संपूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही. सदर बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (07152-243446) अथवा शुभम घोरपडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8888239900) यांच्यांशी संपर्क साधावा असे अहवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने