Top News

महाराष्ट्र नगरपरिषदेत १७८२ जागांसाठी भरती सुरु #chandrapur


जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि निकष

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील जवळपास १७८२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीसाठीची सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे.
पदाचे नाव

स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापाल/ लेखापरीक्षक , कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक. वरील सर्व पदे गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) अंतर्गत आहेत.

पदसंख्या – १७८२

शैक्षणिक पात्रता

स्थापत्य अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य.

विद्युत अभियंता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य.

संगणक अभियंता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य.

पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता – मेकॅनिकल/ पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य.

लेखापरीक्षक/ लेखापाल – B.Com + MS-CIT किंवा समतुल्य.

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.

अग्निशमन अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी + अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण + MS-CIT किंवा समतुल्य.

स्वच्छता निरीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी + स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा.

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १३ जुलै २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०२३

अधिकृत वेबसाईट - http://www.mahadma.maharashtra.gov.in

वयोमर्यादा

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ/ EWS – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –

खुला प्रवर्ग – १००० रुपये.

मागासवर्गीय/ अनाथ/ EWS – ९०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने