खांबावरील इलेक्ट्रिक लाईट एक आठवडापासून बंद? #Chimur


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- चिमूर शहरातील गुरुदेव वार्ड, टिळक वार्ड येथील मुख्य मार्गावरील नेहरू चौकातील खांबावरील इलेक्ट्रिक लाईट जवळपास गेली एक आठवडाभर पासून बंद आहे, नगर परिषद कर्मचारी याच चौकातुन ये-जा करतात परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाही.

अंधारामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. अशा समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रदिप बंडे यांनी केली असून नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून बंद पडलेले खांबावरील इलेक्ट्रिक लाईट तात्काळ सुरू करावी तसेच पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यात नाल्यात अडकलेला कचराकाडी रस्त्यावरील सुका व ओला कचरा याकडे सुद्धा नगर परिषदेने लक्ष दयावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या