Top News

वाहनगाव येथे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न #chandrapur #chimur

शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्राचा उपक्रम

चिमूर:- शिवसेना तालुका चिमूर व लोककल्याण रोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने चिमूर तालुक्यात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत असून तपासणी शिबिराची सुरुवात वाहनगाव येथून करण्यात आली आहे.

शिवसेना युवानेते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे. विधानसभा संपर्क प्रमुख आसिफ बागवान. युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी. उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांचे मार्गदर्शनानुसार वहांनगाव ग्राम पंचायत शिवसेना पक्षचे सरपंच प्रशांत कोल्हे यांच्या संकलपनेतून चिमूर तालुक्यातील गावामधे गाववासियांच्या सेवेकरीता आरोग्य तपासणी. नेत्र परीक्षण. चष्मा व औषधी वाटप शिबिराचे आयोजन शिवसेना चिमूर तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने केले आहे. सदर आरोग्य शिबिर १ जुलै ते ३० जुलै पर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते. शिवसेना सरपंच प्रशांत कोल्हे. नितीन लोणारे. संजय वाकडे. मंगेश ठोंबरे. चेतन कोल्हे. सुनील हिंगनकर. रोशन जुमडे. शार्दुल पचारे. नन्नावरे यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने