समदृष्टी क्षमता विकास एव अनुसंधान मंडल (सक्षम) चंद्रपूर नूतन जिल्हा कार्यकारिणी गठित #chandrapur

Bhairav Diwase

🎆
चंद्रपूर:- विकलांग, दिव्यांग यांचे सर्वांगीण विकास व कल्याणासाठी अखिल भारतीय संघटन म्हणून सक्षम कार्यरत आहे. या संस्थेची चंद्रपूर जिल्ह्यात स्थापना आश्रय बालगृह चंद्रपूर येथे नूतन कार्यकारणी घोषणा करण्यात आली.

🎆
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ स्वयंसेवक श्री मुकुंदजी पाठक, प्रमुख वक्ते सक्षम चे प्रांत संघटनमंत्री श्री आशुतोषजी देशपांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली.

🎆
 प्रमुख अतिथी श्री मुकुनदजी पाठक यांनी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून चंद्रपुरातील ख्यातनाम अस्थिरोग तज्ञ श्री. डॉ चेतनजी नागरेचा व सचिव श्री. मनोज साळवे यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ चेतन नागरेचा यांनी उर्वरित कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी उपाध्यक्ष ऍड.  विनय लिंगे, दिनेश हजारे,  सह सचिव प्रवीण गिलबिले, श्री. प्रकाश राजुरकर,  कोषाध्यक्ष श्री मोहनजी सिरास, संपर्क प्रमुख श्री सचिन चींचमलकर, अजय वैरागडे प्रचार प्रसिध्दी प्रमुख प्रविणजी बतकी, सदस्य राजेंद्र चन्ने, मयुर घटे, शैलेश दिंडेवर, रुपेश देरकर, वृषाली मोहितकर, अजय देशमुख, रमेशजी जैन, हसमुख भाई ठक्कर, सतपालजी जैन यांची घोषणा करण्यात आली.

🎆
          यावेळी प्रमुख वक्ते श्री आशुतोषजी देशपांडे यांनी उद्बोधन करून सक्षम बद्दल माहिती व आगामी कार्यक्रम म्हणून मार्गदर्शन केले. डॉ चेतन नागरेचा व श्री मनोज साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रविण गिलबिले व आभार प्रदर्शन श्री दिनेश हजारे यांनी केले.