ब्रम्हपुरीत शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन चा मेळावा संपन्न #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0
मानधन वाढीसाठी लढा तीव्र करणार:- कॉ. झोडगे

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- गेल्या १५ ते २० वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत अगदी ₹१५०० तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व खाजगी शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी प्रचंड वाढलेल्या महागाईत जगावे कसे?असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.संघटनेच्या अथक संघर्षातून ९ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णय नुसार शापोआ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एप्रिल महिन्या पासून ₹१००० मासिक वाढ केलेली आहे.परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने शापोआ कर्मचारी सरकारप्रती तीव्र नाराजी व्यक्त करत.कुटुंब चालण्यायोग्य मानधन वाढ व किमान वेतन लागू करण्यात यावे यासह इतरही मागण्यासाठी पुढील रूपरेषाआखण्यासाठी आयाटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या मार्गदर्शनात तर कॉ.वनिता कुंठावार जिल्हा सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक जिल्हा परिषद शाळा क्र.२ पेठवार्ड येथे २ जुलै २०२३ रोजी तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला.

यावेळी जिल्हा संघटक श्रीधर वाढई,तालुका अध्यक्ष कुंदा कोहपरे,तालुका सचिव जयघोष दिघोरे यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान २४ हजार वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी,सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी,दर महिन्याला मानधन व इंधन बिल देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत गॅस सिलेंडर,धान्यादि माल व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे,१२ महिन्याचे मानधन देण्यात यावे,किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी,दिवाळी बोनस लागू करण्यात यावे,दर ३ महिन्यातून जिल्हास्तरावर संघटने सोबत बैठक आयोजित करून स्थानिक समस्यांचा निपटारा करण्यात यावा यासह विविध मागण्याविषयी चर्चा करण्यात आली.
येत्या महिना भरात मानधन वाढीचा निर्णय न झाल्यास पावसाळी अधिवेशनात तीव्र लढा करणार असल्याचा इशारा कॉ विनोद झोडगे यांनी दिला आहे.मेळाव्यात तालुक्यातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन कॉ.जयघोष दिघोरे व आभार देवेंद्र भरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)