राजुरा:- राजुरा शहराजवळील बामणवाडा या गावाच्या मागील बाजूला जंगलात जुगार खेळत असताना राजुरा पोलिसांनी आठ आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 50 हजार रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली. यावेळी तीन मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्यात. मोटारसायकलची किंमत दीड लाख असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 'अ' नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कमलाकर ठाकरे, भूपेंद्र साठवणे, अमोल अर्जुन वाघमारे, अनिल जीवन सिंग, रामसिंग निषाद, प्रकाश तायडे, सचिन लडके, दिपक फुले या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई डीवायएसपी विशाल नागरगोजे, एपीआय जोशी, पीएसआय चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत