खवले मांजर जंगलात पकडून ठेवणाऱ्या तिघांना अटक #gadchiroliगडचिराेली:- वन्यजीव अनुसूची १ मध्ये येत असलेले व अतिशय दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या खवले मांजराला पकडून अवैधरित्या जंगलात बांधून ठेवणाऱ्या तीन आराेपींना वन विभागाने १५ जुलै राेजी अटक केली.

सदर आराेपींना न्यायालयात हजर केले असता दाेघांना न्यायालयीन काेठडी झाली तर एकाची सुटका करण्यात आली.

निताई दास, हृदय बाला रा. श्रीनिवासपूर (ता. चामाेर्शी) अशी आरोपींची नावे आहेत. श्रीनिवासपूर येथील निताई गौतम दास (२२) हृदय रेवती बाला (३८) व अन्य एका अल्पवयीन आराेपींने १४ जुलै रोजी वन्यप्राणी खवले मांजर अवैधरित्या पकडून त्याला दोराने बांधून दुचाकी वाहनाने नेत हाेते. परंतु आराेपींना वनाधिकाऱ्यांची कुणकुण लागताच खवले मांजराला वनातच बांधून ठेवले. तसेच खवले मांजर हे जंगलात पळून गेल्याचे वनाधिकाऱ्यांना सांगितले. परंतु वनाधिकाऱ्यांनी स्वस्त न बसता गोपनीय माहिती काढून चामोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. वाडीघरे, चामोर्शीचे क्षेत्रसहायक ए. व्ही. लिंगमवार, भाडभिडीचे क्षेत्रसहायक व्ही. एस. चांदेकर, जामगिरीचे सिद्धार्थ गोवर्धन, आल्लापल्लीचे बोधनवार आदींच्या पथकाने १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता श्रीनिवासपूर येथून तिन्ही आरोपींना चौकशी करीता ताब्यात घेऊन खवले मांजर पळून गेले. त्या ठिकाणी शोधण्यासाठी नेले असता खवले मांजर घोट-चामोर्शी मार्गावरील श्रीनिवासपूर शिवारात आढळले.

खवले मांजर प्रकरणी वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१),(१६),(ए),(बी),९,३९,५०,५१, नुसार दोन आरोपींना १६ जुलै रोजी चामोर्शी न्यायालयात तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्यायालय गडचिरोली येथे हजर केले. पुढील चौकशीसाठी वन कोठडी मागण्यात आली होती; मात्र न्यायालयाने निताई दास व हृदय बाला यांना १५ दिवसाची न्यायालीन कोठडी सुनावली. तर अल्पवयीन आराेपीस जमातीवर सोडण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत