कुभंकर्णी झोपेत असलेल्या नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता भाजयुमो चे खड्ड्यात बसून आंदोलन #chandrapur #Korpana #Gadchandur

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना 
कोरपना:- औद्योगिकरणाने नटलेल्या गडचांदूर शहर हे विविध समस्येनी ग्रासलेले शहर आहे. शहरातील सार्वजनिक आरोग्य, शहरातील पाण्याची समस्या, शहरतील नाली साफसफाई, शहरातील रस्ते अश्या एक ना अनेक समस्याचा पाठा वाचता येईल, परंतु समस्या संपणार नाही अशी अवस्था सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे निर्माण झाली आहे.

शहरातील आतील रस्तेतर खड्डेमय आहेच परंतु मुख्यमार्गावर सुध्दा मोजता येणार नाही एवढे खड्डे रस्त्यात पहावयास मिळते. औद्योगिकीकरणाने नटलेल्या गडचांदूर शहराची खस्ता अवस्था होत असूनही मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात असताना लोकप्रतिनिधी मात्र मुंग गिडून गप्प बसण्यात धन्यता मानत आहे. गडचांदुर शहरात आधीच विविध आजारानी ग्रस्त लोकाची संख्या लक्षणीय आहे. शहरातील अचानक चौक ते छत्रपती शिवाजी चौक ते महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल पर्यंतचा गुजरी बाजार व शहरातील मुख्य बाजारपेठ आणी शाळा, महाविद्यालयात जाणारा वर्दळीच्या या रस्तावर मागील अनेक महिन्यापासून मोठमोठे खडे पडून पूर्णपणे खड्याने व्यापला आहे. संततधार पावसाने पाणी साचल्याने अपघात घडत आहे तर घाण पसरून याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सांडपाणी गटारतील पाणी रस्त्यावर आल्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भावही वाढु शकतो. त्याच प्रमाणे रस्त्यावरील खड्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जात आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याचाच एक भाग म्हणुन कुभंकर्णी झोपेत असलेल्या वा झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपरिषद सत्ताधारी व प्रशासनाला या झोपेच्या सोंगेतुन जागे करण्याच्या व गडचांदुरवासीयांना खड्डेमुक्त रस्ते देण्याच्या उदात्त हेतुने नगर परीषद गडचांदुर यांना काही दिवसांपूर्वी एक निवेदन देऊन खड्डे बुजवण्याची विनंती तथा अल्टीमेट देण्यात आला होता. परंतु सदर निवेदनाला स्पेशल दुर्लक्ष स्थानिक सत्ताधारी व प्रशासनाकडुन करण्यात आले होते.

गडचांदूर शहरात दर मंगळवारला भरणाऱ्या आठवडी बाजारात, खड्डे, चिखल, माती, घाणीचे साम्राज्य अशी दयनीय अवस्था आहे‌. बाजारात दुकान लावणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि बाजारात येणाऱ्या महिला, ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चौदा लाख रुपये किमतीचा लिलाव करून उत्त्पन्न मिळविणाऱ्या गडचांदूर नागरपरिषद ने मात्र आठवडी बाजाराची दयनीय अवस्था करून ठेवली आहे हे विशेष. आणि शेवटी जेव्हा जेव्हा अन्याय सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा तेव्हा क्रांती होत असते हे सत्ताधार्यांना दाखविने गरजेचे असल्याने दि .18 जुलै रोजी खड्ड्यात बसुन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने भा.ज.पा.यु.मो तालुका अध्यक्ष रोहन काकडे यांच्या नेतृत्वाखाली आदोलन करण्यात आले. या आदोलनांची दखल घेत नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ आंदोलन स्थळी येऊन समस्या जाणून घेतल्या व तात्काळ रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. जर हे खड्डे लवकरात लवकर न बुजविल्यास नगरपरिषदेच्या विरोधात व्यापक आदोलन करण्याचा ईशारा आंदोलन करत्यांनी यावेळी दिला.

यावेळी भा.ज.पा शहर अध्यक्ष श्री. सतीश उपलेंचवार युवा नेतेनिलेश ताजने भा.ज.पा.यु.मा.चे संजय ढेपे ,अजीम बेग , प्रतिक सदनपवार, पंकज इटनकर,सुयोग कोंगरे ,कुणाल पारखी, इमरान पाशा यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या