कोरपना:- कोरपना तालुक्यातील सर्वांत मोठा आठवडी बाजार दर मंगळवारी गडचांदूर येथे भरतो. कोरपना तालुक्यासह जिवती व राजुरा तालुक्यातील नागरिकसुद्धा या बाजारात सहभाग घेतात, मात्र, नगर परिषदेचे ठिकाण असलेला आठवडी बाजार संपूर्ण चिखलाने माखलेला असल्याने ग्राहकांनी चालायचं कुठून, हा प्रश्न पडला आहे.
नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेला हा आठवडी बाजार आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून दैनिक व आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांकडून वसुली करण्यात येते. ऑनलाइन निविदेतून जिवती येथील गोविंद पवार या कंत्राटदाराला निविदा प्राप्त झाली असून, त्याद्वारे वर्षभरात नगर परिषदेला आठवडी बाजारातून जवळपास बारा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत निधी मिळतो, हे विशेष