Top News

'गदर 2' ते 'सुभेदार'; ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना अनुभवायला भेटणार 'या' चित्रपटांचा थरार #chandrapur #movie


ऑगस्ट महिना चित्रपट प्रेमींसाठी खास असणार आहे. या महिन्यात रसिकांना काही मोठे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. विविध विषयांवर भाष्य करणारे अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

यामध्ये सनी देओलच्या 'गदर 2' या सिनेमापासून ते अक्षय कुमारच्या 'OMG 2' पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात नेमके कोणते बिग बजेट सिनेमे रिलीज होणार आहेत..


गदर 2 (Gadar 2):- 11 ऑगस्ट 2023
'गदर 2' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल हे दोघे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट गदरचा सिक्वेल असणार आहे.

ओएमजी 2 (OMG 2):- 11 ऑगस्ट 2023
खिलाडी अक्षय कुमारचा 'ओएमजी' (OMG) हा बहुचर्चित सिनेमा 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अक्षयच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांत या सिनेमाची गणना होते. आता 'ओएमजी 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

तारीक (Tarik):- 15 ऑगस्ट 2023
'तारीक' (Tarik) या सिनेमामुळे अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) चर्चेत आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरुण गोपालन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जॉन स्वत: या बहुचर्चित सिनेमाचा निर्मातादेखील आहे.

अकेली (Akelli):- 18 ऑगस्ट 2023
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. तिच्या आगामी सिनेमांच्या यादीत 'अकेली' या सिनेमाचाही समावेश आहे. हा सिनेमा 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अकेली'चं मोशन पोस्टर आऊट झालं असून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2):- 25 ऑगस्ट 2023 प्रदर्शित होणार आहे. 2019 मध्ये आलेला 'ड्रीम गर्ल' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. 'ड्रीम गर्ल 2'चा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात पूजा भट्ट आणि आयुष्मान खुराना हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सुभेदार (Subhedar):- 18 ऑगस्ट 2023
'सुभेदार' मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय पुरकर या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 #chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #news #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment #Trending #Trendingnews #Women'sWorldCup 
#JoeBurrow #UtopiaTravisScott 
#Aliens #ShoheiOhtani #TylerChilders #RandyMeisner #Wordlehint #PostMalone #ZionWilliamson #NancyMace #Chivas #JalenRamsey #googleadsense #blogger #Sudhirmungantiwar #murder #accident #Rape #police #attack #maharashtra #india #manipur #sambhajibhide 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने