Top News

भिवकुंड नाला खोलीकरणाच्या कामात गैरप्रकार #chandrapur #pombhurna


सरपंच, सदस्यांनी केली बिडिओ कडे तक्रार

ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी
पोंभूर्णा:- तालुक्यातील थेरगाव येथे रोजगार हमी योजने अंतर्गत नाला खोली करणाच्या कामातील निधीत गैरप्रकार झाले असल्याचे आरोप करत संबंधित प्रकरणातील ग्रामसेवक व रोजगारसेवक यांची चौकशी करून कारवाई करण्यासाठी थेरगाव येथील सरपंच व सदस्यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देवून मागणी केली आहे.संबंधीतावर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

थेरगाव ग्राम पंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेचे सन २०२१-२०२२ अंतर्गत भिवकुंड नाला खोली करणाचे काम मंजूर झाले होते. त्यानूसार पावसाळ्यापुर्वी नाल्याचे काम सुरू झाले. मात्र ग्रामसेवक व रोजगार सेवकांनी नाला खोलीकरणाचे काम अपूर्ण करून शासकीय निधीत अफरा तफर केले असल्याचे आरोप थेरगावचे सरपंच व सदस्यांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे. तसेच नाला खोलीकरणाचे काम पूर्ण न केल्याने पावसाचे पाणी अनेकांच्या शेतात शिरत असल्याने शेती मध्ये मोठे मोठे खड्डे पडले आहेत, बांद्यातील पाळे फुटले आहेत व शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अर्धवट काम करून १५ लक्ष रुपये एवढ्या शासकीय निधीचे अपहार केले असल्याचे आरोपही यात करण्यात आले आहे.

नाला खोलीकरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्या नुकसानापोटी शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील ग्रामसेवक अंकुश दडमल, रोजगार सेवक बाळकृष्ण सिडाम यांची चौकशी करून त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी सरपंच संगीता गणवीर, उपसरपंच वेदनाथ तोरे, ग्रा.प.सदस्य अभय सातपुते, अश्विनी तोरे, शिल्पा चलाख, चंदा निमसरकार, प्रियंका तलांडे व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.


कामात कोणत्याही प्रकारची अफरा तफर झालेली नाही. केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. आतापर्यंत नाला खोलीकरणात अडिच लक्ष रुपयाचेच अकुशल काम झाले आहे. त्यामुळे १५ लक्ष रुपये इतक्या निधीचा प्रश्नच उद्भवत नाही.
अंकुश दडमल,ग्रामसेवक ग्रा.पं.थेरगाव


 #chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #news  #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup

#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #murder #accident #Rape #police #attack #maharashtra #india #manipur #sambhajibhide

#chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #news  #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #murder #accident #Rape #police #attack #maharashtra #india #manipur #sambhajibhide

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने