विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवार यांची निवड #chandrapur #Congress

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विधिमंडळ पक्ष नेतेपदी बाळासाहेब थोरात राहणार आहे, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली.

यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद रिकामे झाले होते. यानंतर काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्याची संधी आली. यावेळी काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नावांवर चर्चा रंगली होती. पण अखेर विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)