Top News

स्लॅबवरून उडी घेण्याच्या खेळण्यात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू #chandrapur #bhandra #death

भंडारा:- भंडारातून दुर्दैवी घडना घडली आहे. नऊ वर्षांचा मुलाचा स्लॅबवरून उडी घालण्याच्या खेळण्यात मृत्यू झाला आहे. या वेदनादायक घडनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उमंग प्रशांत साखरवाडे असं मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.

ही घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी गावात घडली आहे. घराजवळील स्लॅबवर उमेश आणि त्याचा धाकटा भाऊ सोमवारी (31 जुलै) सांयकाळी खेळत असताना ही दुर्घटना घडली आहे.

उमंग त्याचा धाकटा भाऊ शाळा आटोपून घरी आले. घरी कुणीही नसताना घराच्या स्लॅबवरुन बाजूच्या दुसऱ्या घराच्या स्लॅबवर उडी मारण्याचा खेळ दोन्ही भावंडं खेळत होते. दरम्यान खेल खेळताना उमेशचा तोल जाऊन थेट उंचावरुन जमिनीवर कोसळला. यात त्याच्या शरीरात अंतर्गत जखमा झाल्याने तो थंडगार पडला. शरिरात अंतर्गत गंभीर जखमा झाल्यामुळे त्यातच त्याचा मृत्यू झाला. मोठा भाऊ स्लॅबवरुन खाली कोसळल्याने लहान भावाने धावत जाऊन गावाकऱ्यांना आणि शेतात काम करत असलेल्या वडिलांना सांगितली. गावकऱ्यांच्या मदतीने उमेशला वैद्यकीय उपचारासाठी नेलं. दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने