"त्या" मागण्यांची जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांकडून दखल #chandrapur #DSOchandrapur

Bhairav Diwase
0

जिल्हा क्रीडा संकुलाची जिल्हा क्रीडा अधिकारी व माजी नगरसेवकांकडून पाहणी व चर्चा
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांना खेळात, पोलीस , वनरक्षक सैन्य भरतीत नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी तसेच क्रीडा, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली. याची फलश्रुती म्हणून जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत. तसेच जिल्हा क्रीडा संकुलातील 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, चेंजिंग रुम व इतर क्रीडा सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.

पोलीस, वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या मुलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक मुले-मुली मोठ्या संख्येने जिल्हा क्रीडा संकुलनात पोलिस, वनरक्षक व इतर सैन्य भरतीच्या सरावाकरीता तसेच शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी ग्राऊंडचा वापर करीत आहेत. मात्र त्यांना व्यायाम करण्यासाठी मातीचे मैदान उपलब्ध नसल्याने अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही विद्यार्थी ऍथलेटिकचा सराव करीत आहेत परंतु, त्यांच्या कडे क्रिडा साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांच्या सरावात अळधळा निर्माण होत आहे. त्यामुळे क्रिडा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच मुला-मुलींकरीता चेंजिंग रूम व शौचालये उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना केली. तसेच माहिती प्रत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांना देण्यात आले.
माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी केली जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा

माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांना पोलीस, वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या समस्या सांगितले असता जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुनड यांच्याशी फोनवरून संपर्क करून मुलांच्या मागण्यांची माहिती दिली. व चर्चा केली. आज दि. ०१ ऑगस्टला जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे पाहणी केली. त्यांच्यासमोर मुलांनी समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली. व चर्चा केली असता लगेच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी मुलांच्या समस्या सोडविण्यात येईल असे यावेळी सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सकारात्मक उत्तराने मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

#chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #news  #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #murder #accident #Rape #police #attack #maharashtra #india #manipur #sambhajibhide


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)