दहावीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेत संपवले आयुष्य #chandrapur #akola #suicide

Bhairav Diwase
0

अकोला:- दहावीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात घडली आहे. अकोल्यातील खडकी येथे ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोला शहरातल्या खडकी येथे १० वीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आकाश सुदेश निकोजे असे या मुलाचे नाव असून तो आईवडील आणि बहिणीसोबत राहत होता. घरात कोणी नसल्याचे पाहून मुलाने गळफास घेवून स्वतःचे आयुष्य संपवले.

या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असावे.. याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान खदान पोलिसांसमोर आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)