चेक बल्लारपुर येथील जुगारावर पोलिसाची धाड

Bhairav Diwase
0

सात आरोपी अटकेत तर दहा आरोपी फरार

२ लक्ष ६३ हजार २५०  रुपयाचा मुदेमाल जप्त 
पोंभूर्णा: चेक बल्लारपुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे वानिकरणाच्या झुडपात जुगार खेळणा-यांवर पोंभूर्णा पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत सात जणांना अटक करण्यात आली तर १० जण फरार होण्यास यशस्वी झाले. बुधवारला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी रोख रक्कम व दुचाकी असा सुमारे २ लक्ष ६३हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सविस्तर वृत्त असे की अनेक दिवसापासून चेक बल्लारपुर येथे खुलेआम जुगार खेळल्या जात होते.जुगार खेळण्यासाठी तालुक्यातील पोंभूर्णा,जामतूकुम, कसरगट्टा,व गोंडपीपरी,बल्लारपुर तालुक्यातील जुगारी चेक बल्लारपुर येथे एकत्रित येऊन लाखो रुपयांचा जुगार खेळायचे. बुधवारला चेक बल्लारपुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे असलेल्या वानिकरणात काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोंभूर्णा पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली असता तिथे काही लोक जुगार सुरु असल्याचे आढळून आले. धाड पडताच घटनास्थळावर पळापळ सुरु झाली. यात ७ जुगारी पोलिसांच्या हाती लागले. तर १० जुगारी पसार होण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय उध्दव धिवे (५२) रा.मानोरा, दिवाकर प्रभाकर पिपरे (३६) रा. मानोरा ,गणेश विजय सुरमवार (२९) रा.पोंभूर्णा, गंगाधर नारायण कोंडगटीवार,(३०) रा.पोंभूर्णा, रामदास रामचंद्र पुष्पलवार (३९) रा.पोंभूर्णा, लक्ष्मण पोचना शेरखी (३६ ) रा.पोंभूर्णा, प्रभाकर आबाजी दूधकोर (४३) रा.चेक बल्लारपुर हे पोलिसांच्या हाती लागले तर भास्कर चोखरे,आकाश चोखारे,बंडू फरकाडे, नरेंद्र माहुरे,स्वप्नील मत्ते,दिलीप भगत हे सर्व राहणार चेक बल्लारपुर तर नितीन रामचंद्र धोडरे रा.कसरगट्टा, पिंटू पडोळे रा.रामपूर दीक्षित, बोच्चे रा. वडकुली यांच्यासह आणखी जुगारी पसार झाले आहे. कारवाईत ४ दुचाकी ,७ मोबाईल व १९ हजार २५० रुपये रोख असा एकूण २ लक्ष ६३ हजार २५०रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार बंदी कायदा १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही ठाणेदार मनोज गदादे,राजकुमार चौधरी,अविनाश झाडे,बादल जाधव,जगदीश पिपरे,अरविंद चुधरी यांनी केली.घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)