Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे राज्य स्तरीय निबंध स्पर्धा संपन्न #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा:- चिंतामणी इन्स्टिट्यूशन्स चे आधारवड सन्माननीय स्व. श्री. वसंतरावजी दोंतुलवार यांची ७८ वी जयंती साजरी करण्यात आली . जयंतीच्या निमित्ताने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचा विषय समान नागरी संहिता हा होता.स्पर्धा चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात अली होती. स्पर्धा आभासी स्वरूपात झाली असून निबंध महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील विविध महाविद्यालयातून आलेले होते. बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी डॉ लेमराज लडके , प्राचार्य, एन एस कॉलेज भद्रावती ; डॉ. प्रिया गेडाम, संचालिका, विद्यार्थी विकास विभाग , गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री गुरुदास कामडी हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजीव वेगीनवार, प्राचाय, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली असून स्व श्री वसंतरावजी दोतुलवार आणि स्व श्री वैभव दोंतुलवार यांच्या पावन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. नंतर विद्यापीठ गीत घेऊन विद्यापीठाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पाहुण्यांचे परिचय व स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्या व्यतिरिक्त,  डॉ एन एच पठाण, डॉ. ए.एस. देशपांडे, पूनम बावणे, डॉ. शीला सूर्यतले, डॉ. सुधीर हुंगे यांनी व्यासपीठाचा मान वाढविला. श्री कामडी यांनी समान नागरी संहिता वर प्रकाश टाकला तर डॉ लडके सर विद्यार्थ्याने मेहनत केली पाहिजे असे  सांगितले. डॉ गेडाम मॅडम नी निबंध स्पर्धेची सरहना केली आणि विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.  विजेत्यांची नावे घोषित करून बक्षीस, वितरण करण्यात आले. विजेते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तसेच SNDT मुंबई येथील ठरले.  आभासी पद्धतीने जुळलेल्या स्पर्धकांनी आपले अभिप्राय दिले. तसेच डॉ कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून अभिप्राय दिला.  कार्यक्रमाचे संचलन डॉ वैशाली मुरकुटे यांनी तर प्रास्ताविक श्री चंद्रकांत वासेकर यांनी केले. आभार डॉ बालाजी कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने