Click Here...👇👇👇

नाल्यात पोहायला गेलेल्या युवकाचा मृत्यू #chandrapur #rajura

Bhairav Diwase


राजुरा:- राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यात पोहायला गेलेल्या संतोष मनोहर कोडापे वय २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तो
सध्या तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. दरम्यान गोवरी गावातील संतोष कोडापे वय २२ वर्षीय युवक गावाला लागून असलेल्या नाल्यात पोहायला गेला. त्यांनी शिवाजी हायस्कूल जवळील बंधाऱ्यावरून उडी मारली, पण त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व खड्ड्यातील चिखलात फसून मृत्यू झाला. या घटनेने कोडापे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू आहे.