Top News

पोलीस स्टेशनच्या आवारात पुन्हा एका महिलेने घेतले विष

वाचा काय म्हणाले पोलीस उपविभागीय अधिकारी?

वरोरा:- स्थानिक वरोरा पोलीस स्टेशनमध्ये सात ऑगस्टला अत्याचार पीडित एका आदिवासी महिलेने विष प्राशन करण्याची घटना ताजी असतानाच आज 8 ऑगस्टला परत एका महिलेने वरोरा पोलीस स्टेशन आवारात संध्याकाळच्या वेळी विष प्राशन प्रयोग साकारल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार खांबाडा येथील अर्चना दिवाकर दिवटे वय 48 हिने चार दिवसांपूर्वी महादेव चाफले याचे विरोधात शेतीच्या वादातून घडलेल्या घटनेची पोलीस तक्रार केली होती. सदर महिलेच्या मालकीच्या शेतातील काही शेतपट्टा महादेव चाफले यांना विकण्यात आला होता. महादेव चाफले याने आपल्या शेतहद्दीत खांब रोवणे सुरू केले असता सदर महिलेच्या मते ते खांब तीच्या मालकीच्या शेतहद्दीत रोवल्यामुळे शेतातील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे वादावादी होऊन सदर महिलेने वरोरा पोलीस ठाण्यात त्याची तक्रार करून महादेव चाफले याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी महादेव चाफले यांनीसुध्दा पोलीसांकडे तक्रार सादर केली होती.

पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्टला वरील दोन्ही पक्षांनी परस्परांच्या विरोधात शेताची हद्द या कारणावरून झालेल्या वादात एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर शेतीविषयक प्रकरण हे सिविल मॅटर असून याचा संबंध महसूल विभागाशी असल्याने उपरोक्त चौकशी सुरू होती. परंतु आठ ऑगस्टला संध्याकाळी अर्चना दिवाकर दिवटे ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन महादेव चाफलेवर तुम्ही कारवाई का केली नाही अशी बतावणी करु लागली. पोलीस तिच्याशी विचारपूस करीत असताना तिने लघुशंकेला जाऊन येते असे सांगून वॉशरूम जवळून परतल्यावर पोलीस आवारात विष प्राशन केल्याचा बनाव केला. तीच्या जवळील पिशवीत शेतपीकांवर मारण्यात येणारे मोनो नावाचे जहर जप्त करण्यात आले आहे. सदर जहरप्राशन प्रकरणातील तिच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत.

या घटनेनंतर पोलिस प्रशासन पुन्हा एकदा हादरले आणि तिला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पेश करण्यात आले असता सदर महिलेने डॉक्टरांना प्रथमोपचार करण्यास मनाई केल्याने लगेच तिला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

सदर महिलेच्या बाबतीत पुढील कार्यवाही म्हणून मेडिकल चेकअप, फॉरेन्सिक अँनेलेसिस केले जाईल आणि हा केलेला विषप्राशनाचा प्रकार केवळ बनाव असल्याचे आढळून आल्यास सदर महिला व तिच्यासोबत पोलीस ठाण्यात आलेल्या इसमांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरोरा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने