Top News

विकृत मानसिकता घरा घरातून नष्ट व्हावी:- अल्का आत्राम #chandrapur #mul #pombhurna


मुल:- जुनगाव येथे शाळेतील उपक्रम दिव्यांग निधी गोळा करताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या पीडित कुटुंबातील घरी जाऊन भेट घेत चर्चा केली. ही कृती ही विकृत मानसिकतेचा प्रकार आहे आहे या असल्या लोकांमुळे आज मुली स्वतःला असुरक्षित समजू लागल्या आहेत त्यामुळे प्रत्येक समाजातून घरातून असल्या विकृत मानसिकता घालवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
 या घटनेचा तपास एस डी पी ओ इंगळे साहेब यांचे कडे आहे त्यांचेशी चर्चा करून पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. पोलीसानी अतिशय तात्काळ कार्यवाही कालच केली आरोपीला अटक करून सर्व गुन्हे दाखल केले. या बाबतीत कठोर कायदे व्हावे जेणेकरून यावर आळा बसेल आणि आरोपीला कठोर कार्यवाही होईल यासाठी निवेदन देण्यात आले. 

यावेळी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री महिला मोर्चा, वंदना आगरकठे जिल्हा महामंत्री, रत्नमाला भोयर ओ बी सी आघाडी अध्यक्ष, राहुल पाल उपसरपंच, पांडुरंग पाटील पाल,उषा शेंडे माजी नगराध्यक्ष, अर्चना चावरेअध्यक्ष मूल महिला , वैशाली बोलमवार महिला अध्यक्ष पोंभुर्णा, रजिया कुरेशी सचिव महिला मोर्चा, सुनीता म्यॅकलवार माजी नगरसेविका, कल्पना मेश्राम महामंत्री, शुभांगी पर्यावरण अध्यक्ष, भारती हरमवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने