Top News

प्रशांत दांडवे यांचं वाढदिवस साजरा करताना #chandrapur #sindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो.याची जाण ठेऊन आपण निसर्गाचं देणं आहे.या कृतज्ञतेच्या भावनेतून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिसरात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजकुमार गुरनुले यांनी केले.
सिंदेवाही तालुक्यातील *ज्ञानगंगा मल्टिपर्पज फॉउंडेशन च्या वतीने सिंदेवाही* पोलीस स्टेशनच्या मोकळ्या जागेत *श्री. सागर महाले(psi) सर* यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
ज्ञानगंगा मल्टिपर्पज फॉउंडेशन च्या वतीने एक मुल, एक झाड हा उपक्रम व संस्थेचे सचिव *श्री. प्रशांतजी दांडावे सर* यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने विविध प्रकारचे झाडे लावुन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी या वृक्षरोपणाच्या कार्यक्राला संस्थेचे अध्यक्ष सौ.स्वेताताई मोहुर्ले, बावणे सहाय्यक फौउजदार सर, विनोद बावणे सर, गंगाधर सहारे सर, सौ.मेघाताई निकोडे, श्री.सुधाकर सुरपाम, ललिताताई खोब्रागडे, कल्पनाताई भोयर, आसावरी गुरनुले, सुलभाताई कांबळी विद्याताई वाढई तसेच प्रशांत दांडवे (फुचर इन्स्टिट्यूट सिंदेवाही)आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने