पोंभूर्णा:- बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील उमरी पोतदार बीटात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना (दि.८ आगस्ट)मंगळवारला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. सुनील मनोहर कोडापे (वय ३२ वर्षे) रा.उमरी पोतदार असे गंभीर जखमी झालेल्या गुराखीचे नाव आहे.
उमरी पोतदार नियत क्षेत्रातील कक्ष क्र. ४४६ मधील वनक्षेत्रात मंगळवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास मनोहर झुरमुरे यांचे १० म्हशी घेऊन गुराखी सुनील चराई करीत होता.अचानक एक वाघ म्हशी जवळ गेल्याने म्हशी भुजाळून पळू लागले. गुराखीला लक्षात येताच म्हशीच्या दिशेने धावत जातांना दबा धरून बसलेल्या दुसऱ्या वाघाने गुराख्यावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले.यादरम्यान बाजूला असलेले इतर गुराखी आरडा ओरड केल्याने सुनीलचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सुनील ला वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी क्षेत्र सहाय्यक ए.एस.पठाण,वनरक्षक राकेश बुरांडे,वनकर्मचारी सुनील पेंदोर यांनी जखमीला तात्काळ सानुग्रह मदत दिली.