Top News

दुचाकीची समोरासमोर धडक:एक ठार तर तीन जण जखमी #chandrapur #saoli


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील पाथरी पालेबारसा या मार्गावर आज सायंकाळी चारच्या सुमारास दोन दुचाकी मध्ये जोरदार धडक झाल्याने यात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झालेले आहे.

सावली तालुक्यातील विहीरगाव येथील अजय कोटांगले व पद्माकर नन्नावरे हे कामानिमित्त पाथरीला जात असतानाच पाथरी जवळील कन्हाळगाव येथील राकेश गुरुदास मिळावी अनुराग वसंत गेडाम हे आपल्या गावाकडे परत येत असतानाच या दोघात जोरदार दुचाकी मध्ये धडक झाल्याने या धडकेत अजय कोटांगले राहणार विहीरगाव हे जागीच ठार झाले असून यात पद्माकर ननावरे, राकेश मडावी, अनुराग गेडाम हे जखमी असल्याची माहिती पुढे येत आहे.

अपघात होताच जखमींना पाथरी पोलीस घटनास्थळी पोहचली व जखमींना येथील प्राथमिक रुग्णालयामध्ये उपचाराकरता भरती करण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला? याचा तपास पाथरी पोलीस पुढे करणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने