अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक #chandrapur #pombhurna #Mul


पोंभुर्णा:- दिव्यांग निधी गोळा करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला निधी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बेंबाळ पोलिस दूरक्षेत्रअंतर्गत जुनगाव येथे सोमवारी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला सोमवारी अटक केली. नितेश विनाजी नवघडे (२२, रा. जुनगाव) असे आरोपीचे नाव आहे.

जुनगाव येथील एक अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षकांच्या आवाहनावरून नागरिकांकडून दिव्यांग निधी गोळा करीत होती. सोमवारी दुपारी गावात फिरत असताना आरोपीने निधी देण्याच्या बहाण्याने तिला घरी बोलावून अत्याचार केला. हा सर्व प्रकार रडत जाऊन तिने आईला सांगितला. आईच्या तक्रारीवरुन मूल पोलिसांनी आरोपी नितेश नवघडे याच्याविरुद्ध पोस्को ४, ८ कलम बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार संरक्षण अधिनियम कलम ३ (१) (११) (१) (२) ३ (२) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत