कर्मचाऱ्याच्या डोक्यात चपराश्याने घातला हातोडा #chandrapur

Bhairav Diwase
0

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील घटना

चंद्रपूर:- उपविभागीय अधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालय असलेल्या भवनात शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या बाबू घनश्याम मेश्राम यांच्यावर कार्यालयात पूर्वी कार्यरत असलेल्या चपराशी सुधाकर वाढई याने हातोडीने त्याच्या डोक्यावर मारून जखमी केले.

परिसरात चर्चेनुसार सुधाकर वाढई हा यापूर्वी याच कार्यालयात चपरासी होता. कर्तव्यावर असताना त्याचे एक दोन वर्षांपासून जीपीएसचे प्रकरण अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने तो वारंवार बाबू घनश्याम मेश्राम यांच्याकडे खेटा मारायचा. आजही तो सकाळी बाराच्या सुमारास येऊन मेश्राम बाबू यांना भेटून गेला. परत सायंकाळी पाचच्या सुमारास पॉलिथिनमध्ये हातोडी घेऊन सरळ मेश्रामबाबू बसले असता त्या केबिनमध्ये जाऊन त्याच्या डोक्यावर हातोडीने वार केल्याने तो रक्त बंबाड झाला.. कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले गेले. आणि पढील अनर्थ टळला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)