Top News

ओबीसी हितासाठी सदैव प्रयत्न करू:- हंसराज भैया अहिर


ब्रम्हपुरी:- येथील भाजपा ओबीसी मोर्चा पदाधिकारी प्रा. प्रकाश बगमारे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा ओबीसी मोर्चा,मनोज भूपाल ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक,सुभाष नाकतोडे महामंत्री ओबीसी मोर्चा,ज्येष्ठ नेते प्रा.दिवाकर पिलारे,नगर पदाधिकारी घनशाम सूर्यवंशी यांनी नुकतीच चंद्रपूर येथे भेट घेऊन केंद्र व राज्य सरकार ने ओबीसी जनगणना घेण्यात यावी,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या,५२ टक्के ओबीसीना ५२ टक्के आरक्षण देण्यात यावे, चंद्रपूर गडचिरोली येथील कमी करण्यात आलेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे,तालुका स्तरावर ओबीसी साठी स्वतंत्र वसतीगृहाची निर्मिती करण्यात यावी,जिल्हा परिषद शाळेतील ओबीसी विद्यार्थ्यांना एस सी,एस टी प्रमाणे सवलती देण्यात याव्या,एस सी,एस टी प्रमाणे नानक्रिमिलयेर अट रद्द करण्यात यावी,एस सी,एस टी प्रमाणे ओबीसींना सुद्धा १०० टक्के परतावा देण्यात यावा,ओबीसी स्कॉलरशिप उत्पन्न एस सी,एस टी प्रमाणे ₹ २ लाख ठेवण्यात यावी,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी बारटी, सार्थी प्रमाणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विभाग स्तरावर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे,ओबीसी महामंडळाला भरीव निधी देऊन ओबीसी बेरोजगारांना प्रोत्साहन व सवलती देण्यात याव्यात,ओबीसी कर्मचारी यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे,ओबीसी समाजावर होणारा अन्याय संधी देऊन दूर करण्यात यावा या मागण्याचे निवेदन प्रा. प्रकाश बगमारे यांचे नेतृत्वाखाली दिले व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल अहिर यांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने