पीडित महिला अंदाजे 36 वर्षांची असून तिने ऑक्टोबर 2022 मध्ये आरोपी इरफान शेख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीवर 376 आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक झाली होती. मात्र या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्यावर आरोपी आणि त्याचे नातलग त्रास देत असल्याचा पीडित महिलेचा आरोप होता. सोबतच आरोपींना वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश चौरे मदत करत असल्याचा देखील महिलेने आरोप केला होता, आरोपींना मदत करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकनिलेश चौरे यांच्यावर कारवाई करण्याची महिलेने शनिवारी वरोरा येथे प्रेस कॉन्फरन्स घेत मागणी केली होती. मात्र API चौरे यांच्यावर कारवाई न झाल्याने महिलेने वरोरा पोलीस स्टेशन मध्ये विष घेतले. महिलेला पहिले वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
आज पोलिस स्टेशन येथे या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी पत्रकार परिषदेत आरोपी यावर बलात्कार चा गुन्हा तसेच अन्य आरोपी यांच्यावर मारहाणी चा गुन्ह्याची नोंद करून अटक करण्यात आली असून हे प्रकरण न्यायालयीन असून आज झालेल्या घटनेवर पीडित महिलेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगितले.