Top News

घारगाव येथे अझोला निर्मिती बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अझोला वापरा खर्च कमी करा"

चामोर्शी:- घारगाव येथे केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी च्या विद्यार्थ्यांनी अझोला निर्मितीची प्रक्रिया करून अझोलाचे महत्त्व शेतकऱ्यांना कळवून दिले.
"अझोला हे उथळ पाण्यावर तरंगणारे नेचे वर्गीय वनस्पती आहे. सामान्यपणे अझोला भात शेतात किंवा उथळ पाण्याच्या जागी उगवते. अझोला हे जास्त संख्येने व वेगाने वाढणारी वनस्पती आहे. तसेच अझोला हे कमी जागेत व कमी परिश्रमात जास्तीत जास्त उत्पादन करून देणारी वनस्पती आहे म्हणून शेतकऱ्यांना हे एक उत्तम पर्यायी खाद्य म्हणून वापरता येते. 

घारगांव येथे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ४ ऑगस्ट रोजी अझोला निर्मिती करून त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना कळवून दिले. घारगाव येथील शेतकरी भगिंद्र झाडे , दिवाकर चुधरी , प्रकाश आभारे , रुपेश तुंबडे, विवेक भगत यांच्या शेतात प्रात्यक्षिक केले व अझोला निर्मितीचे महत्त्व पटवून दिले.
हा उपक्रम प्राचार्य डॉ.आदित्य कदम , सहा.प्रा. छबील दूधबळे, सहा.प्रा. तुळशीदास बारस्कर, सहा.प्रा. अमोल डोंगरवार , सहा.प्रा. सायली मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला. यावेळी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी श्रीगणेश मारभते , प्रीतम घोगरे , सुबोध गुरनुले , आदित्य चुधरी आणि निखिल लंजे हे उपस्थित होते.

अझोला चे फायदे:- १) जनावरांसाठी उत्तम पशुखाद्य : दूध उत्पादनात वाढ. २) धान पिकासाठी उपयुक्त अशी जैविक व सेंद्रिय खत. ३) कुक्कुटपालनात अझोला चा वापर: वजनात वाढ, अंडी देण्याच्या क्षमतेत वाढ

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने