Top News

ब्रम्हपुरीत मणिपूरच्या घटनेच्या निषेधार्थ भव्य जन आक्रोश मोर्चा #chandrapur #bramhapuri

हजारोच्या संख्येने महिला पुरूष सहभागी

ब्रम्हपुरी:- मणिपूर येथे मागील तीन महिन्यापासून सामुहिक जातीय हिंसाचाराच्या घटनांमुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश हादरून गेलेला आहे. अशा घटनांमुळे देशातच नाहीतर संपूर्ण जगात सुद्धा भारताची प्रतिमा मलीन झालेली आहे. तसेच या हिंसक घटना वाढतच चालल्या आहेत.मणिपूर येथे हिंसक जमावाने दोन निरापराध महिलांची सामूहिक नग्न धिंड काढून त्यांच्यावर जे अमानवीय अत्त्याचार केले, ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.


अशा आणीबाणीच्या वेळी संवैधानिक जबाबदारी पायदळी तुडवत राज्य व केंद्रीय सरकार हे अत्याचार सत्र उघड्या डोळ्यांनी बघत बसले आहेत. ह्या अमानुष अत्याचार मालिकेचा व त्यांच्या पाठीराख्यांविरुद्ध ब्रम्हपुरी जनतेमध्ये प्रचंड संताप व आक्रोश निर्माण झालेला आहे. त्यामुळे संतप्त जनता अत्याचार करणाऱ्या सर्व नराधमांना व त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाही करण्याची एकमुखी मागणी करीत आम्ही भारतीय लोक ब्रम्हपुरी यांच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.मोर्चाची सुरुवात राजीव गांधी सभागृह येथून सुरुवात होऊन शहरातील मुख्य रस्त्याने मोर्चा आगेकूच करीत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला.याप्रसंगी समितीचे निमंत्रक विनोद झोडगे,प्रा.सुभाष बजाज,कोल्हे सर,सुधा राऊत,रेखा धोंगडे,योगिता आम्हले,अर्चना खंडाईत ऍड.गोहने मॅडम,वैशाली रामटेके,डॉ.प्रेमलाल मेश्राम यासह आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मणिपूर येथील स्त्री सन्मानाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या मणिपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. व मणिपूर येथे महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या झुंडीतील सर्व नराधमांना आणि शेकडोंच्यावर निरपराध नागरिकांची निर्घून हत्या करणाऱ्या,जाळपोळ करून घरादारांची राख रांगोळी करून लोकांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या सर्व नराधमांना त्वरित अटक करून फाशी देण्यात यावी.मणिपूर राज्यातील जातीवादी दंगलखोर एन.बिरेन सिंग सरकारला त्वरित प्रभावाने बरखास्त करून तिथे राष्ट्रापती राजवट लागू करण्यात यावी.मणिपूर राज्यातील हिंसक आणि भयावह परिस्थिती पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून माहिती असून सुद्धा त्यात हस्तक्षेप करून कसलीही प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता स्त्रियांची व निरपराध नागरिकांची हत्या घडू देणाऱ्या आणि जगभरात आपल्या भारत राष्ट्राची प्रतिमा कलंकित करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब राजिनामा द्यावा.बेजबाबदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा देऊन पदावरून पायउतार व्हावे,अचानकपने मैतेई समुदायाला नोटीफाइड ट्राइब घोषित करण्याबाबत मणीपूर राज्य शासनाला मणीपूर हायकोर्टाने आदेश दिला. तेव्हापासून अमानवीय हिंसाचारांची सुरुवात झाली. हा आदेश अचानकपणे पारीत करणाऱ्या न्यायाधिशांच्या हेतूची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर काढन्यात यावे. या मागणीचे निवेदन महामहीम राष्ट्रपती राज्यपाल मणिपूर यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत तहसीलदार सयाम यांना असे निवेदन देण्यात आले यावेळेस सुधा राऊत,योगिता आमले,जया कन्नाके,सुकेसनी बनसोड, शारदा घोनमोडे,रेखा धोंगडे,अर्चना खंडाईत,अंजली उरकुडे,वैशाली रामटेके,कुंदा कोहपरे,अपेक्षा कुळमिथे,वर्षा जुमनाके,प्रतिभा नवघडे,अनिता सोनटक्के,सुशीला सोंडवले,अंजीर बागडे,वर्षा बागडे,निशताई मडावी,ऍड.नंदा फुले,हेमलता सलामे,वंदना मडावी आदी महिला उपस्थित होते.मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरुष मंडळी मोर्चात सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने