कार्यक्रमाचे पाहुणे लायन इंजिनिअर रामकुमार झाडे यांनी डॉक्टर गिरीश भुयार, डॉक्टर श्रीकांत गेडाम व श्री कांताप्रसाद गुप्ता या नवीन सदस्यांना शपथ देऊन क्लबमध्ये सहभागी केले. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून नगरपरिषद ब्रह्मपुरी च्या मुख्याधिकारी श्रीमती अर्शिया जुही मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांना त्यांच्या विशेष कार्यासाठी गौरविण्यात आले. क्लब चार्टर प्रेसिडेंट व नव्याने एमजेएफ झालेले श्री प्राध्यापक उमेश मिश्रा, प्रोजेक्ट डायरेक्टर श्री वसंत कावळे, प्रथम एमजे एफ मेजर विनोद नरड, संचालक झेड कार्ड असोसिएशन, ब्रह्मपुरी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
माजी अध्यक्षांनी श्री वसंत कावळे व श्री रामकुमार झाडे यांना सन्मानित केले.
नवीन अध्यक्षांनी पदभार स्वीकारताना आपल्या पुढील वाटचालीची रूपरेषा सादर केली. प्राध्यापक शेखर बन्नोरे व मेजर विनोद नरड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सचिव श्री सामृतवार यांनी पाहुण्यांचे, उपस्थितांचे व माननीय श्री अशोक भैय्या, सचिव, ने.हि.शिक्षण संस्था ब्रह्मपुरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक शंकरराव केळझरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर विजयकुमार खंडाते, सौ ज्योती कावळे, सौ अर्चना मोहरकर, श्री गिरीश मानापुरे, श्री किशोर आमले, श्री श्रीधर गौड व क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी लायन कुटुंब व इतर आमंत्रित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत