Click Here...👇👇👇

नदीत आंघोळ करणे जीवावर बेतले #chandrapur #bramhapuri 🇮🇳

Bhairav Diwase
२१ वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- तालुक्यतील भालेश्वर येथील वैनगंगा नदीपत्रात अंघोळीकरिता गेलेला युवक बुडल्याची धक्कादायक घटना दि.१६ ऑगष्ट ला सकाळी ७ च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार मृतक गोपाल अरुण नाकतोडे (२१) रा.चिखलगाव हा आपले भाऊजी यशवंत अरुण ठेंगरी रा. कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी यांचे समवेत काही मुलांसोबत अधिक मासाची पूजा विसर्जन करण्याकरिता दि.१६ ऑगष्ट ला सकाळी ६ च्या सुमारास भालेश्वर येथील वैनगंगा नदीपात्रात आले होते.विधिवत पूजा झाल्यानंतर मृतक गोपाल अंघोळीला गेला असता नदीपात्रातील अंदाज न आल्याने नदीत बुडाला असून बाहेर न निघाल्याने याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली मात्र २ तासाच्या शोधमोहिमेनंतर युवकाचा शोध लागला नव्हता त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केल्यानंतर उशीरा युवकाचा शोध लागला आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.