Top News

स्वातंत्र्य दिनी दोन युवकांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून करुन अंत #chandrapur #bhadrawati

दोघेही आय.टी.आय.चे विद्यार्थी


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- यंदाच्या स्वातंत्र्य दिनी भद्रावती तालुक्यातील येथील दोन युवकांचा जुनाळा येथील वर्धा नदीच्या पात्रात बुडून करुण अंत झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा करण्याकरिता येथील पाच युवक वणी तालुक्यातील जुनाळा गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावर गेले. तेथे गेल्यावर आदर्श देवानंद नरवाडे (२१) रा. गजानन नगर, भद्रावती व त्याचा मावसभाऊ रितेश नथ्थुजी वानखेडे (२०) रा. शिवाजी नगर, भद्रावती या दोन युवकांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी नदीच्या पात्रात उतरुन पोहायला सुरुवात केली. दरम्यान, आदर्श हा खोल पाण्यात बुडायला लागल्याचे रितेशच्या लक्षात आले. त्याने आदर्शला हात पकडून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र रितेशसुद्धा पाण्यात बुडू लागला. हे त्यांचा मित्र रोहन याच्या लक्षात येताच त्याने त्या दोघांना वाचविण्याची हिंमत केली नाही. त्याने सोबतच्या इतर दोन मित्रांना आदर्श आणि रितेश पाण्यात बुडाल्याची माहिती दिली.
ही घटना दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती उर्वरित तीन मित्रांनी रितेश आणि आदर्श यांच्या कुटुंबियांना भ्रमणध्वनीवरुन दिली. घटना स्थळ वणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने वणी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू केली.
दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता घटनास्थळापासून काही अंतरावर रितेशचा मृतदेह आढळून आला. तर ८ वाजता आदेशचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर वणी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. दुपारी ४ वाजता येथील पिंडोनी स्मशानभूमीत रितेश आणि आदर्श यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

   रितेश वानखेडे हा येथील एका दुकानात खाद्य पदार्थ वितरित करण्याचा काम करायचा. तसेच तो वरोडा येथे आय.टी.आय.चे प्रशिक्षण घेत होता. तर आदर्श नरवाडे हा येथीलच एका बिअर बारमध्ये कुक म्हणून काम करीत होता. तसेच तो सुद्धा भद्रावती येथे आय.टी.आय.चे प्रशिक्षण घेत होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने