Top News

गेवरा बुज जि.प. शाळेच्या शौचालयाची दुरवस्था? #Chandrapur #saoli

संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष?

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- सर्वशिक्षाअभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकातील बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा खर्चही करण्यात येत आहे. मात्र, खेडे गावातील बऱ्याच शाळांमध्ये सोयी-सुविधांची ऐशीतैशी झाली आहे. दिवसातील पाच ते सहा तास शाळेत घालवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य स्वच्छतागृहाच्या दुरवस्थामुळे धोक्यात आले आहे. अशीच घटना सावली तालुक्यातील गेवरा बुज येथील जिल्हा परिषद शाळेची झालेली आहे.

शाळेमध्ये उत्तम वर्ग खोल्या, खेळण्यासाठी मैदान, उत्तम शिक्षक,इतर सर्व सुविधा आहे. बाहेरून उत्तम दिसणाऱ्या शाळा इमारतींची खऱ्या अर्थाने ‘बाहर से टामटूम अंदरसे रामजाने’, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे असूनही नसल्यासारखीच आहेत. दुर्दैवाने ही सत्य परिस्थिती आहे. विध्यार्थ्यांना शौचास लागल्यास त्यांना वर्गातील तास सोडून घरी पाठवण्यात येते.
शासनाला वारंवार पाठपुरावा देऊन शिक्षक त्रासले आहे तरी संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

सर्वत्र घाण, दुर्गंध, खर्रे-पान खाऊन थुंकलेल्या भिंती अशा भयानक वातावरणात चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपला कार्यभाग उरकावा लागतो. बोलक्या चित्रामुळे शाळा व्यवस्थापनाला बालकांच्या ‘राइट टू पी’ या अधिकाराचा विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, विशेषत: प्रत्येक शाळेत मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छतागृहे असावे, असा निर्णय शासनाने एस. एन. एन./ १०९९/ (२४०/९९) उमाशि-२ दिनांक २२ डिसेंबर २००० नुसार जारी केला. परंतु, हा शासन निर्णय कागदोपत्रीच राहिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे.
सदर घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रशासनाने स्वछतागृहाची नव्याने बांधणी करून देण्यात यावी अशी मागणी शाळेतील शिक्षक करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने