बापरे! २० फूट उसळून घरावर आदळली कार #chandrapur #nagbeed #bramhapuri


चंद्रपूर:- ब्रह्मपुरी-नागभीड राष्ट्रीय महामार्गावरील भिकेश्वर फाट्यावर गुरुवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. महिलाचालक असलेल्या एका कारने दुचाकीला ठोस मारून २० फूट उसळी घेत घराला जोरदार धडक दिली. कारमधील कुणालाही इजा झाली नाही. मात्र दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ढेबू दयाराम कुत्तरमारे (४२) असे जखमीचे नाव आहे.

नागपूर येथील तीन महिला एम.एच. ३१ बीके ५३११ क्रमांकाच्या कारने ब्रह्मपुरीला जात होत्या. भरधाव कारने दुचाकीस्वार ढेबू कुत्तरमारे याला भिकेश्वर फाट्यावर धडक दिली. या अपघाताने महिला कारचालक चांगलीच गोंधळली आणि या गोंधळात कारवरील नियंत्रण सुटले. ही कार २० फूट अंतरावर असलेल्या एका घराच्या सज्जाला आदळून खाली पडली. अंगणात कुणी असते तर मोठा अनर्थ घडला असता. दुचाकीस्वार ढेबू कुत्तरमारे याला ब्रह्मपुरी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. नागभीड पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी कार ठाण्यात जमा केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या