Top News

नदीत वाहून गेलेल्या चार युवकांचे मृतदेह मिळाले #chandrapur #wani #death #bhadrawati

वणी:- तालुक्यातील वर्धा नदीवर सहलीसाठी आलेल्या चार जणाचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 15 ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. हे चारही मृतदेह गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी आढळून आले आहेत.
वणी शहरालगत असलेल्या नायगाव (खु.) येथील पाच ते सहा युवक वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. त्यातील प्रवीण सोमलकर (वय 36) व दिलीप कोसारकर (वय 40) हे दोघे नदीपात्रात आंघोळ करताना वाहून गेले. संध्याकाळपर्यंत शोध घेतला असता मृतदेह आढळून आले नाही. गुरुवारी दोघांचेही मृतदेह याच नदीत माजरीजवळ आढळले.
दुसर्‍या घटनेत शिरपूर पोलिस ठाणे हद्दीतील जुनाड येथील वर्धा नदीपात्रात दोन तरुण आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते. रितेश नथ्थू वानखेडे (वय 18) व आदर्श देवानंद नरवाडे (वय 20) हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आहेत. गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी दुपारी या चौघांचेही मृतदेह आढळून आले. सर्व मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने