दोन ट्रकांचा भीषण अपघात, दोन्हीही ट्रक जळून खाक #chandrapur #gadchiroli #Fire


चंद्रपूर:- सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक ‌व कोठारीकडून सुरजगडकडे जाणारा ट्रक यांची कोठारीपासून 6 किमी अंतरावर गणपूर गावाजवळ समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही ट्रक जाळून खाक झाले. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. सदर घटना गुरुवार दि.१७ ऑगस्टचे रात्री १० वाजताच्या दरम्यानची आहे.

सदर घटनेची माहिती कोठारी पोलिसांना मिळताच घटनास्थळावर पोहचून आगीवर नियंत्र करण्यासाठी गोंडपिपरी, पोंभुर्णा, बल्लारपूर येथील अग्नीशामन दलास पाचारण करून तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

कोठारी-गोंडपीपरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने व भीषण आग लागल्याने चार तास वाहतूक खोळबली होती. घटनेची दाखल कोठारी पोलिसांनी घेत गुन्ह्याची नोंद करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार विकास गायकवाड करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या