Top News

तब्बल दीड महिन्यानंतर टोमॅटोचे दर 60 प्रतिकिलो #chandrapur #tamatar


चंद्रपूर:- बाजारात तब्बल दीड महिन्यापासून दीडशे ते दोनशे रुपये किलो भावासह गगनाला भिडलेल्या टोमॅटो दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांना एक पाव टोमॅटो खरेदीसाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागत होते; मात्र आता पावसाने उसंत दिल्याने; तसेच गेल्या तीन- चार दिवसांपासून बाजारपेठेमध्ये टोमॅटो मालाची आवक दुप्पट झाल्याने टोमॅटो बाजारभावाची लाली
मोठ्या प्रमाणात उतरली आहे. 

ग्राहकांना आठवड्याभरापूर्वी किमान 150 ते 160 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी कराव्या लागणाऱ्या टोमॅटोचा दर आता 60 रुपये किलोवर आल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने आवक कमी झाली होती.

परिणामी बाजारभाव गगनाला भिडले होते. महिनाभरापूर्वी टोमॅटो दर सव्वाशे रुपये किलोपर्यंत गेले होते. तर त्यात आणखी वाढ होऊन आठवडाभरापूर्वी टोमॅटो दर 160 ते 200 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते. टोमॅटो दर वाढल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाक बजेट बिघडले होते. रोजच्या आमटी, भाजीतील टोमॅटो गायब झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने