'नको ओवाळणी नको खाऊ, जुनी पेन्शन द्या हो एकनाथ भाऊ ब्रम्हपुरीत अनोखी रक्षाबंधन#chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0
काँग्रेस पक्षाने ज्याप्रमाणे हिमाचल प्रदेश, राजस्थान ,छत्तीसगड या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली तशी महाराष्ट्रात लागू करा:- डॉ. स्निग्धा कांबळे


ब्रम्हपुरी:- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे ओ. पी. एस. राखी अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या पर्वावर ख्रिस्तानंद चौक ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा ब्रह्मपुरी च्या महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता.त्या पुतळ्याला ब्रह्मपुरी तालुक्यातील असंख्य महिला कर्मचऱ्यांनी राखी बांधली आणि 'नको ओवाळणी नको खाऊ ,जुनी पेन्शन द्या हो एकनाथ भाऊ' अशा प्रकारचे नारे लावले. या निमित्ताने जुनी पेन्शन संघटना महिला तालुका आघाडीच्या अध्यक्ष डॉ. स्निग्धा कांबळे यांनी ज्याप्रमाणे हिमाचल प्रदेश ,राजस्थान, छत्तीसगड मध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती योजना लागू करावी आणि इथल्या कर्मचारी महिलांना तसेच सर्व कर्मचारी वर्गाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी केली.

या रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा ब्रह्मपुरीचे तालुकाध्यक्ष सतिश डांगे, सचिव प्रशांत घुटके , कोशाध्यक्ष अनंता ढोरे,मंगेश नदेश्र्वर,मनीष वैरागडे, अविनाश मस्के,संध्या बंसोड,सुरेखा कावळे,विद्या फुंड, मीनाक्षी मार्बते,कल्पना पेटकर,योगिता रामटेके,वसुधा रामटेके,लीना उके,अस्मिता कराडे, प्रियंका नंदनवार,प्रीती भैसारे,सुषमा उंदिरवाडे, राजुरकर मॅडम आदी महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात विविध विभागाच्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)