Top News

विकास नगर पंधरा दिवसापासून तहानलेला #chandrapur #pombhurna


टॅंनकरने होत असलेला पाणी पुरवठाही बंदच

पोंभूर्णा:- पोंभूर्णा शहर विकासाच्या कामात कात टाकत आहे.पाणी पुरवठ्यासाठी करोडो रूपये खर्च करून पाईप लाईन टाकून शहरात पाणी पुरवठा केल्या जात आहे.मात्र यात प्रभाग क्रमांक १, विकास नगर ची जनता १५ दिवसापासून तहानलेली आहे.भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वार्डवासियांची भटकंती होत होती.वार्ड वासियांची अडचण लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने टॅंकरने पाणी पुरवठा सुरू केला होता.मात्र काहीच दिवसात टॅंकरने होत असलेला पाणी पुरवठा बंद करण्यात आला असल्याने लोकांचे हाल होत आहेत.विकास नगरमध्ये नळाचा पाणी पुरवठा पुर्वरत सुरू करा अन्यथा नगरपंचायतवर‌ घागर मोर्चा काढू असा इशारा नगरसेवक बालाजी मेश्राम यांनी दिला आहे.

पोंभूर्णा शहर हे विकास माॅडेल म्हणून समोर येत आहे.शहरातील पाणी पुरवठ्यासाठी करोडो रुपये खर्च करून नवीन पाईप लाईन टाकण्यात आले.जनतेचा पाणी प्रश्न मिटेल हि आशा होती.मात्र नगरपंचायत कडून काही वार्डात हेतू परस्पर पाणी पुरवठा केल्या जात आहे.शहरातील प्रभाग क्रमांक १, विकास नगर येथे मागील पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे.वेगवेगळे कारणं सांगून ठेकेदार वेळ मारून नेत आहे.तर प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे.विकास नगर येथे मुख्याधिकारी यांच्या आदेशाने काही दिवस टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आले होते.मात्र काहीच दिवसात टॅंकरने पाणीपुरवठा करने बंद झाले.पावसाळ्याच्या दिवसात लोकांना पाणी मिळत नसेल तर यापेक्षा दुर्भाग्य कोणते असा प्रश्न वार्डवासिय उपस्थित करीत आहेत.पाणी पुरवठा होत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत.मुख्याधिकारी कडून टॅंकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश असताना कर्मचारी मात्र पाणी पुरवठा करीत नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.जर तात्काळ विकास नगरमध्ये पाणी पुरवठा पुर्वरत सुरू न केल्यास नगरपंचायतवर‌ घागर मोर्चा काढू असा इशारा नगरसेवक बालाजी मेश्राम यांनी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने