चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची पदभरती #chandrapur #Zpchandrapur


चंद्रपूर:- शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध विभागातील व विविध संवर्गातील गट – क ची एकूण 519 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार व वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सविस्तर जाहिरात https://zpchandrapur.co.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर रिक्त पदांकरीता इच्छुक उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या लिंकवर 4 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 च्या रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदन सादर करता येणार आहे. तसेच जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जि.प. चंद्रपूरच्या https://zpchandrapur.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या संकेतस्थळावर ठराविक दिनांकापर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज सादर करतांना काही अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्रमांक 07172-255592 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवड मंडळ निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) यांनी केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत