गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश #chandrapur #warora

Bhairav Diwase
0

वरोरा:- वरोरा चिमूर मार्गावर असलेल्या खातोडा या गावाजवळ काल रात्री दिनांक 17 ऑगस्ट गुरुवार ला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना तसेच जनावरे कत्तलखान्यात नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चारचाकी गाडी क्रMH34BG1632 पोट्रोलिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या दुचाकी क्र MH 34BL5313 सह, एकूण 26 जनावरसह आरोपींनी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.खातोडा या गावाजवळ अब्दुल नवी अब्दुल गफार, रा. कॅलरी वार्ड, याचे शेत असून या शेतातच जनावरांच्या कत्तलिसाठी खूप मोठा बंडा बांधण्यात आला आहे, पोलीसांना खातोंडा गावाजवळ बोलेरो पिकप गाडीत मध्ये 7जनावरे भरून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली, पोलीसांनी लगेच आपले सूत्र हलवित या गाडीचा शोध घेत आरोपींनी रंगेहाथ पकडले , यात आरोपी बिलाल जाकीर कुरेशी 18 , डोलारा. , ता भद्रावती,रितिक वसंता आत्राम, वय 23 , एकर्जूना.राजेंद्र भाऊराव सोयाम वय 55, कॉलरी वार्ड, नेहाल राजेंद्र सोयाम 26,राहणार कालरी वार्ड, वरोरा , यांना अटक केली,तसेच गोवंश तस्करीसाठी वापरण्यात आलेला आलेली ,चार चाकी वाहन अंदाजे की600000, पेट्रोलिंग साठी वापरण्यात आलेली दुचाकी अंदाजे किंमत,30,000, शेतीच्या बंड्यात जवळ जवळ 30 जनावरे आढ़ळून आली. यांची किंमत 3,90000, मोबाईल असे एकूण 956000रू चा मुद्देमाल सह पोलीसांनी आरोपींनी अटक केली, यांच्यावर गोवंश तस्करी करणे गोवंशाची हत्या करणे या असे विविध गुन्हे नोंदविण्यात आले, पैकी आरोपी अब्दुल नबी अब्दुल गफार कुरेशी, रा कॉलरी वार्ड, हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे, पोलीसांनी फरार आरोपीस पकडण्याकरिता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन आरोपपत्रसह आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने आरोपींना दिनांक 18 अगस्त ते एक सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, या संपूर्ण प्रकरणाचा तपास शेगावचे ठाणेदार मेश्राम यांच्या अधिपत्याखाली पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)