कत्तलखान्यात जाणाऱ्या चोवीस गुरांची केली सुटका #chandrapur #pombhurna #police


वाहनात कोंबून जाणारे तीन गोवंशाचा झाला मृत्यू
पोंभूर्णा:- पोलिस स्टेशन पोंभूर्णा हद्दीतील चिंतलधाबा- केमारा रोडवरून गोवंश तस्करी होणार असल्याची गुप्त माहितीच्या आधारे चिंतलधाबा-केमारा रोडवर नाकाबंदी लावण्यात आली दरम्यान अवैध गोवंश वाहतूक ‌करणारे तीन पिक-अप ताब्यात घेतले.मात्र या दरम्यान काही अंतरावर जाऊन थांबलेले पिक-अप चालक पळून जाण्यात यशस्वी झाले.तीन पिक-अप मध्ये एकूण २७ नग गोवंश जनावरे अवैधरित्या बेकायदेशीर वाहतूक करतांना सापडले.यात कोंबून नेत असलेले तीन गोवंश मृत्यू झाले होते.त्यांचेकडून २७ गोवंश जनावरे, तीन पिक-अप गाड्या असा एकूण २६ लक्ष ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावेळी गोवंश करणारे आरोपी जंगलाचा फायदा घेत पळून गेले.त्यांचे विरुध्द भादवी कलम ४२९,३४,महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सहकलम ५ (१)अ, ५ ब,प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम कायदा ११ (१)(ड),अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही ठाणेदार मनोज गदादे, पोलिस उपनिरीक्षक श्रिकांत कलपल्लीवार,पोलिस हवालदार वासुदेव आत्राम,पोलिस अंमलदार राजकुमार चौधरी, अविनाश झाडे,अरविंद चुधरी यांनी केली असून पुढील तपास हवालदार वासुदेव आत्राम करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या