पक्ष फोडण्यापेक्षा पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे! #Chandrapur #Maharashtra #Mumbai


कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला

मुंबई:- गृहमंत्री फडणवीसांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे नाही तर नोकर भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरु असलेला खेळ तिघाडी सरकारने थांबवावा अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर सरकारला ते महागात पडेल, असा इशाराही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी भाजपप्रणित राज्य सरकार खेळ खेळत आहे. नोकर भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही अशी एकही परिक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परिक्षेचा पेपर फुटला आणि लाखो तरुणांची निराशा केली. सरकारला परिक्षाही घेता येत नाहीत, सातत्याने पेपरफुटी होत आहे. पण राज्य सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पाहात नाही. तलाठी परिक्षेच्या पेपर फुटीमागे जे लोक असतील त्या सर्वांचा छडा लावून कठोर शिक्षा करा जेणेकरून भविष्यात कोणीही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नोकर भरतीच्या नावाखाली राज्यातील तीन पक्षांचे येडे सरकार विद्यार्थ्यांची क्रूर खट्टा करत आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जातात. 4466 तलाठी पदासाठी राज्यभरातून 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज भरले आणि यातून 1 अब्ज 4 कोटी 17 लाख रुपयांचे परीक्षा शुल्क घेतले. पण विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्रही दिले नाही.

परिक्षेसाठी स्वतःच्या जिल्ह्यातून दूरचे परीक्षा केंद्र दिले गेले. त्यामुळे हजारो विद्यार्थी या परिक्षांना मुकले आहेत. एवढे करुनही या परिक्षेचा पेपर फुटला हे अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या